शिरपूर : गुन्हा दाखल न करण्याकामी दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिस स्टेशनला कार्यरत हवालदार उमेश गुलाबराव पाटील यांना भोवली असून त्यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलेल्या तक्रार अर्जाच्या आधारे संबंधीतविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीकामी मदत करण्याकामी हवालदार उमेश पाटील यांनी 4 फेब्रुवारी रोजी दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधीत तकारदाराकडे केली होती. त्या मागणीच्या आधारे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेत रितसर तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी नाशिक विभागाच्या एसीबी पथकाने हवालदार उमेश गुलाबराव पाटील (52) नेमणूक शिरपूर शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्यासह पो.नि. मृदुला नाईक, पो.नि. किरण रासकर, पो.हवालदार दिपक कुशारे, पोलिस हवालदार सचिन गोसावी, पोलिस हवालदार मोरे,पो.ना. एकनाथ बाविस्कर , पो.ना. अजय गरुड, चालक पो.ना. शिंपी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.