बहिणीच्या लग्नासाठी तरुणाने केला अपहरणाचा बनाव,भावाला फोन करून मागीतली पाच लाख रुपयांची खंडणी

On: July 7, 2020 5:01 PM

वझीराबाद : बहिणीच्या लग्नासाठी पैशांच्या गरजेपोटी तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. वझीराबादमध्ये ही घटना घडली असून उघड झाली आहे. आपले अपहरण झाल्याचे सांगून खंडणीसाठी आपल्याच भावाला तरुणाने फोन केला. त्याने भावाला पाच लाख रुपयांची मागणी केली. खंडणीचे पाच लाख त्याने काकांकडून घेण्यास सांगितले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांना संशय आला. ज्या मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता, त्या फोनवर त्यांनी पाळत ठेवली. काही तासांच्या आत तरुणाचा हा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपी सलमान यास अटक केली असून त्याच्या ताब्यातील फोन देखील तपासकामी जप्त केला आहे. बहिणीचे लग्न करायचे असल्यामुळे त्याला पैशांची गरज होती. काकांकडे खूप पैसे आहेत हे त्याला ठाऊक होते. पोलिसांनी सलमान विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment