जळगाव : क्रिकेट विश्वाचा महान फलंदाज मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर याच्या जन्मदिनानिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन 21, 23 व 24 एप्रिल रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण पाचशे खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक स्तरावर सहभाग घेतला होता. प्रश्नमंजूषा स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा मास्टर पुलर्स संघ विजयी ठरला आहे.
ऑनलाईन झालेल्या या प्रश्नमंजूषा स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकडमीच्या चार संघाने सहभाग घेतला. यामध्ये संघ मास्टर पुलर्स (तनिष जैन, सौरभ चव्हाण, रेहान शेख), जैन स्ट्रेट ड्रायव्हर्स (वरुण देशपांडे, विजयकुमार अय्यर, अन्मय जैन), सुपर पेसर्स (नचिकेत ठाकूर, आकाश महाले, ओजस सुवर्णकार, उत्कर्ष शिंदे), आय कोचेस (आषुतोष माळुंजकर, निरज जोशी, पार्थ देवकर, मानव टिंब्रीवाला) या खेळाडूनी आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला. प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या प्रथम फेरीत जैन स्पोर्टस ॲकडमीच्या मास्टर पुलर्स, जैन स्ट्रेट ड्रायव्हर्स, सुपर पेसर्स या तीन संघांनी विजय मिळवीत उपउपांत फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. उपउपांत फेरीतसुध्दा तिघंही संघानी आपली कमाल दाखवित विजय संपादन केला. यानंतर झालेल्या उपांत्य फेरीच्या स्पर्धेत मास्टर्स पुलर्स व सुपर पेसर्स या संघाने विजय प्राप्त केला. उपांत्य फेरीच्या सामना जिंकून मास्टर्स पुलर्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रश्न मंजूषाची अंतीम फेरी जळगाव च्या मास्टर्स पुलर्स व मुंबईच्या मासूम जैन या संघामध्ये झाली. प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या अंतीम फेरीत मास्टर्स पुलर्स विजेते ठरले. संपूर्ण स्पर्धेत 500 खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक स्तरावर सहभाग नोंदविला. जैन स्पोर्टस ॲकडमीचे संचालक अतुल जैन, अरविंद देशपांडे व मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी विजयी संघाचे कौतुक केले.