जळगाव : आज रात्री 8.45 वाजता ममुराबाद विदगांव दरम्यान दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्याने जबर अपघात झाला आहे. या अपघातात लहान बालकाचा देखील समावेश आहे. यातील दोघे जण शिवाजी नगर – लक्ष्मी नगर हुडको येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे राहुल नेतलेकर, राहुल तिवारी, नितीन तमायचेकर यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची सोय केली.जखमींना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे.