निलंबित पो.नि.सुनिल माने यांना न्यायालयीन कोठडी – जिवीतास धोका असल्याचा दावा

On: May 1, 2021 5:07 PM

मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अटकेतील मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित पो.नि. सुनिल माने पोलीस निरीक्षक सुनील माने यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 13 मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. माने यांच्या जिवीताला धोका असल्याचा दावा त्यांच्या परिवाराकडून करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तोंडी आदेश देत कारागृहात सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे येथील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी निलंबित पो.नि. सुनिल माने अटकेत होते. आज त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे न्यायालयात हजर करण्यात आले होते. माने हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात असल्यामुळे व त्यांनी अनेक गुंडांवर कारवाई केलेली असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका असल्याचा दावा नातेवाईकांनी न्यायालयात केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment