योगेश ठरला रेमडीसिवीरचा बळी

On: May 5, 2021 10:26 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील बाळद येथील चाळीस वर्षीय युवक कोरोनाच्या ट्रिटमेंट मधील रेमडीसिविरचा बळी ठरला आहे.

बाळद येथील कपाशी व्यापारी व वि. का. सोसायटी सदस्य योगेश रामकृष्ण सोमवंशी या चाळीस वर्षे वयाच्या युवकाला कोरोना झाल्यावर त्याच्यावर गेल्या काही दिवसांपुर्वी चाळीसगाव येथील एका कोविड सेंटर ला औषध उपचार सुरू होते या उपचार संपल्यावर घरी आल्यावर त्याला पुन्हा नाकात फंगल झाले. यात रेमडीसिव्हर चा साईट इफेक्ट झाला त्यामुळे त्याचे फंगल इन्फेक्शन झाल्याने पुढील उपचार नाशिक येथे सुरू होते. उपचारादरम्यान आज. दि. ५ रोजी नाशिक येथेच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी भाऊ आई असा परीवार आहे. परीसरातील शेतकर्‍यांनी हळहळ व्यक्त केली. कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे चुलत भाऊ होते.ग्राम पंचायत सदस्य सुभाष पाटील यांचे पुतणे होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment