दया नायक मुंबई टू गोंदीया

On: May 7, 2021 11:12 AM

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस अधिकारी दया नायक यांची मुंबई पोलिस दलातून थेट गोंदीया जिल्हा जात प्रमाणपत्र समितीत बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी हा आदेश काढला आहे.

सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिस दलात भाकरी फिरवण्याचे काम अर्थात बदल्यांच्या कामकाजाला गती आली होती. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे देखील त्यातून सुटले नाहीत. आतापर्यंत सुमारे 86 पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. मनसुख हिरेन मर्डर केस मधील विविध पथकापैकी जुहू एटीएस टीमचे प्रमुख दया नायक हे होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment