आजचे राशी भविष्य (31/7/21)

मेष : प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील. ओळखीतून लाभ मिळवता येईल.

वृषभ : जास्त जबाबदा-या घेणे योग्य राहणार नाही. गृहीणी आज दिवसभर व्यस्त राहतील.

मिथुन : विनाकारण होणारे वाद टाळावे. शेजा-यांशी सलोखा वाढेल.

कर्क : उद्योग-धंद्यात मनाजोगी आवक राहील. शक्यतो कुणी दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.

सिंह : अति श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल.

कन्या : कामाच्या व्यापामुळे थोडेफार सैरभैर व्हाल. खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाईल.

तूळ : कामात चांगला उत्साह राहील. पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

वृश्चिक : सगळ्याच गोष्टी मनासारख्या होणार नाही. नोकरीत वरिष्ठांच्या फार नादी लागू नका.

धनू : भक्तिमार्गात आवड निर्माण होईल. सज्जनांच्या सहवासात मन रमेल.

मकर : विरोधक चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

कुंभ : कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व व कर्तृत्व प्रभावी राहील. घरगुती अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मीन : धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here