शेगावात तरुणाचा खून

शेगाव : शेगाव येथील खम्मु जमदार नगरातील मशिदीच्या खोलीत रविवारी पहाटे तरुणाचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी मयताच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरुणाचा खून त्याच्या पित्यानेच केला असल्याचा संशय आईने फिर्यादीत नमुद केला आहे.

शहरातील गरीब नवाज मशिदमध्ये पहाटे पाचच्या सुमारास अजान देण्यासाठी सय्यद अली सय्यद महेबुब हे गेले होते. त्यावेळी त्यांना मशिदमधील खोलीत एक तरुण निद्रावस्थेत दिसून आला. त्यांनी इतर दोघांच्या मदतीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मयत झाला असल्याचे लक्षात आले. मयत तरुण मो.सलीम शे.कासम (19) हा स्थानिक खम्मु जमदार नगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

मयत तरुणाची आई जैबुन्निसा कासम शेख यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. मयत मो. सलीम शेख कासम याचा खुन त्याचा बाप शेख कासम शेख गफूर यानेच केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मयताची आई गेल्या काही दिवसांपासून तिच्या माहेरी माटरगाव येथे तिच्या मुला व मुलींसह राहण्यास गेली होती. सलिम हा बहिणीचे लग्न असल्यामुळे 15 मे रोजी शनिवारी मसाला खरेदी करण्यासाठी शेगाव येथे आलेला होता. पोलिस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. नितीन इंगोले पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here