अँड.हेमंत मुदलियार यांचे निधन

On: May 21, 2021 6:52 PM

जळगाव : जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे संचालक तथा प्रसिद्ध वकील अँड.हेमंत मुदलीयार यांचे हदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने बुध्दिबळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे.

सुमारे विस वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी व स्पर्धांसाठी शिवाजी पुतळ्याजवळील जे.टी.चेंबर मधील जागा त्यांनी उपलब्ध करून दिली होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून परत आल्यानंतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या स्वागतासाठी त्यांची जीप कायम उपलब्ध रहात होती. ते खेळाडूंसाठी लागणारी नोटरी विनामुल्य उपलब्ध करुन देत होते. सर्वसामान्य खेळाडूंसाठी अ‍ॅड. हेमंत मुदलियार हे जणू काही हक्काचे व्यासपीठ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी नेहा व मुलगा ओम आहेत. त्यांची मुलगी नेहा ही देखील जैन स्पोर्टस अकॅडमीची आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडू आहे. तिने देखील कायद्याचे शिक्षण पुर्ण केले असून सध्या ती एलएलएमच्या प्रथम वर्षाचे शिक्षण देखील घेत आहे. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल मधून तिने आपले शालेय शिक्षण घेतले आहे.

त्यांचा मुलगा ओम हा पुणे येथे बीसीए चे शिक्षण घेत आहे. बुध्दिबळाच्या खेळासोबतच जळगांव जिल्हा होमगार्डचे व्दितीय समादेशक व जिल्हा रायफल असोसिएशन तसेच जिल्हा रेडक्रॉस सोसायटीवर अ‍ॅड. हेमंत मुदलीयार हे संचालक होते. त्यांनी अनेकदा रक्तदानाचा विक्रम केला आहे. मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले अ‍ॅड. हेमंत मुदलीयार यांच्या अकाली जाण्याने वकीली क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment