पन्नास लाखाची चोरी करणारे दोघे एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव : तामिळनाडू येथील रहिवासी असलेले मोहनकुमार जगाथागी देवनयागम या व्यापा-याकडे कामाला असलेल्या नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने पन्नास लाख रुपयांची जबरी चोरी केली होती. तामिळनाडू – सेलम पोलीस स्टेशनला याप्रकरणी भाग 5 गु.र.न. 248/21 भा.द.वि. 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात सहभाग असलेले दोघे आरोपी राजस्थान येथील होते. ते चोरीच्या रकमेसह राजस्थानात जाणार असल्याची माहिती सेलमच्या पोलिस अधिक्षकांना समजली होती. त्यांनी याबाबतची माहिती जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना कळवली होती. त्यानुसार पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपले सहकारी या आरोपींच्या मागावर रवाना केले होते.

या पथकाने मलकापुर ते जळगाव दरम्यान चेनई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसच्या प्रत्येक बोगीची बारकाईने तपासणी केली. या तपासणीअंती पथकाला मंगलराम आसुराम बिस्नोई (19) रा.खडाली ता.गुडामालाणी, जि.बाडमेर (राजस्थान) याच्यासह एक अल्पवयीन मुलगा गवसला. या दोघांकडून तामिळनाडू येथील चोरी केलेल्या रकमेपैकी 37 लाख 97 हजार 780 रुपये आढळून आले. या रकमेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन,शरीफ काझी,युनुस शेख,प्रदीप पाटील, जयंत चौधरी , सुनिल दामोदरे,विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, मुरलीधर बारी यांनी या तपासकामात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here