पुणे : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडीलांवर पुणे येथे चाकू हल्ला झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे पुणे – निगडी येथे घर आहे. या घरात काल चोरीचा प्रयत्न झाला होता.
अजय विष्णू शेगटे असे घरात शिरलेल्या चोरट्याचे नाव असून तो सोनालीचा चाहता असल्याचे म्हणत आहे. दोरीच्या मदतीने घराच्या गॅलरीत शिरलेल्या अजय शेगटे याच्याकडे सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे लक्ष गेले. दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेगटे याने चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. शेजा-यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने जमावावर मिरची पुड फेकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास सुरु आहे.