धरणगावला जि.प., प.स.च्या पावतीवर दंडात्मक कारवाई

धर्मराज मोरे याजकडून
धरणगाव जि. जळगाव : धरणगाव येथे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या सबबीखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पावतीवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पावतीच्या माध्यमातून दोनशे रुपयांची आकारणी केली जात आहे. हे दोनशे रुपये नेमके कोणत्या कारणासाठी वसुल केले जात आहे याचा कोणताही तपशील पावतीवर नाही. त्यामुळे धरणगाव येथील सदर पावतीधारक नागरिकांमधे संतापाची लाट उसळली आहे. या पावतीवर बीडीओचा अर्ध गोलाकार शिक्का आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी देखील या पावतीवर आक्षेप घेतला आहे.

धरणगाव येथे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या दंडात्मक पावत्या देण्यात अतिरेक झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या अतिरेकामुळे पालिकेने पावती पुस्तक देण्याचे बंद केल्याचे म्हटले जात आहे. आता जि.प. व पंचायत समितीच्या पावत्या दिल्या जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना विचारणा केली असता शहरी भागातील कारवाईशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here