जळगाव : यावल तालुक्यातील गिरडगांव ग्रामपंचायत हद्दीतील अंदाजे 79 हजार रुपये किमतीची झाडे विनापरवानगी कापून नेल्याप्रकरणी गेल्यावर्षी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा गिरडगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अलकाबाई पाटील यांच्या फिर्यादीनुसार एप्रिल 20 मधे सद्दाम शहा खलील शहा याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सद्दाम शहा फरार होता.
अटकेपासून बचाव होण्यासाठी सद्दाम शहा याने बरेच प्रयत्न केले. मात्र त्याला त्यात यश आले नाही. फरार सद्दाम शहा 2 जून रोजी किनगाव येथे आला असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. पो.नि. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने त्याला शिताफीने अटक केली. त्याला अटक करण्याकामी पोलिस उप निरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हे.कॉ.असलम खान, पो.कॉ.सुशील घुगे, पो.कॉ.निलेश वाघ, रोहील गणेश यांच्या पथकाने सहभाग घेतला.