गोडाऊनमधे चोरी करणा-या चौघांना मध्यरात्री अटक

On: June 7, 2021 5:40 PM

जळगाव : जळगाव शहराच्या एमआयडीसी हद्दीतील एफ सेक्टर मधील विणा फुडस या कंपनीच्या गोडाऊनमधे मार्च महिन्यात चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेत  गोडाऊनमधील विस हजार रुपये किमतीचे एजिट्रेटर 3 नग, दहा  हजार रुपये किमतीचे वॉटर पंप 3 नग, दहा हजार रुपये किमतीचे पॉश्चरईजरची बॅलन्स टाकी 1 नग, पाच हजार रुपये किमतीचे स्टील कंट्रोल पॅनल 1 नग, 30 हजार रुपये किमतीचे बॉयलरचे गॅस बर्नर 1 नग, दहा हजार रुपये किमतीचे स्टीलचे ट्रे 11 नग, 5 हजार रुपये किमतीचे एम.सी.बी. 4 नग व साठ हजार रुपये किमतीचे शेन अ‍ॅंण्ड ट्युब कंडेन्सर इंस्टंट चिल्ड वाटर 1 नग असा एकुण 1 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. 

पो.नि.प्रताप  शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्याच्या तपासात  रमेश उर्फ साई सोनाजी आठे (30) रा. गजानन बाबा रिक्षा स्टॉप सुप्रिम कॉलनी जळगाव, सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड (22) रामदेव बाबा किराणा जवळ सुप्रिम कॉलनी जळगाव, दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण (22) रा. रामदेव बाबा किराणा जवळ सुप्रिम कॉलनी जळगाव,  रिजवान शेख इस्लाम (42) रा. बागवान मोहल्ला नवीपेठ जळगाव अशा चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपी सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड याच्याकडून बॉयलर गॅस बर्नर तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली प्रवासी रिक्षा, 15 हजार रुपये किमतीचे एओसी कंपनीचे मॉनिटर, 3 हजार रुपये किमतीचे इंटेक्स कंपनीचे सिपीयु, 5 हजार रुपये किमतीचे डीव्हीआरसह त्याचे साहित्य, 500 रुपये किमतीचे लिनोव्हा कंपनीचे किबोर्ड व माऊस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटकेतील आरोपी  सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला  विविध गुन्हे दाखल आहेत. अटकेतील रमेश आठे याच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनसह जिल्हापेठ पोलिस स्टेशनला देखील चोरीचा गुन्हा दाखल आहे. अटकेतील आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने चौघांना दहा तारखेपर्यंत पोलिस कोठडी  सुनावली आहे.  या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी,  या गुन्ह्याचा तपासात पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी,  गफ्फार तडवी, इमरान सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, मुदस्सर काझी, हेमंत कळसकर, किशोर पाटील, सतिष गर्जे, यांनी सहभाग घेतला. सरकारतर्फे न्यायालयीन कामकाज अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी पाहिले. अटकेतील आरोपींकडून अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment