पतीच्या खूनाची पत्नीने दिली सुपारी ! आरोपींना झाली जेलची सवारी !!

पतीच्या खूनाची पत्नीने दिली सुपारी !
आरोपींना झाली जेलची सवारी !!

अमरावती :  उमेश सावळकर
याचा मंगरुळ
दस्तगिर या
गावी टेंट
हाऊसचा व्यवसाय
होता. यासोबत
जोडीला त्याचे
कापड दुकान
देखील होते. दोन
व्यवसाय सोबतीला
असल्यामुळे उमेशच्या
हातात चांगल्याप्रकारे
पैसा खेळत
होता. त्याच्या
टेंट हाऊसचे
किरकोळ सामान
वाहून नेण्यासाठी
उमेश यास
कित्येकदा रिक्षा
लागत असे. त्यासाठी
कित्येकदा हनुमंत
साखरकर याच्या
रिक्षातून सामानाची
वाहतुक केली
जात होती. त्यातून
उमेशची हनुमंत
सोबत मैत्री
झाली होती. बघता
बघता उमेश
आणि हनुमंत
हे दोघे
एकमेकांचे चांगले
मित्र झाले. दोघांचे
एकमेकांच्या घरी
जाणे येणे
देखील सुरु
झाले होते.
रिक्षाचालक हनुमंतची
पत्नी अनुराधा
दिसायला देखणी
होती. हनुमंतच्या
घरी उमेश
आला म्हणजे
त्याची अनुराधासोबत
नजरानजर होत
असे. त्यातून
कित्येकदा उमेश
तिच्याकडे चोरट्या
नजरेने देखील
बघत असे. उमेश
हा सौंदर्याचा
पुजारी होता. त्याच्या
पारखी नजरेने
हनुमंतची पत्नी
अनुराधाचे सौंदर्य
टिपले होते. बघता
बघता उमेश
अनुराधा
यांच्यात सुत
जुळले. घरात
पती असतांना
देखील विवाहीता
अनुराधाचे उमेशवर
प्रेम जडले. तिला
पतीपेक्षा पतीचा
मित्र उमेश
जवळचा वाटत
होता.
चोरीचा मामला
जास्त दिवस
लपून रहात
नाही असे
म्हटले जाते. त्यामुळे
आपली पत्नी
अनुराधा आणि
मित्र उमेश
यांच्यातील प्रेमाची
चाहुल हनुमंतला
लागण्यास वेळ
लागला नाही. त्यामुळे
पती पत्नीत
वाद होवू
लागले. हनुमंत
रिक्षा घेवून
बाहेर गेला
म्हणजे इकडे
उमेश
अनुराधा यांच्यात
प्रेमाचा वार्तालाप
सुरु होत
असे. जसजसा
अनुराधा
उमेश यांच्यातील
प्रेमाचा सिलसिला
वाढत गेला
तसतसा अनुराधा
हनुमंत
यांच्यातील दुरावा
आणि वाद
देखील  वाढत होता. इकीकडे
पती तर
दुसरीकडे प्रियकर
अशी अनुराधाची
गत झाली
होती. पती
असतांना देखील
अनुराधाचे उमेश
सोबत असलेले
संबध परिसरात
देखील एक
चर्चेचा विषय
झाला होता. 
पती हनुमंत
कडून होणारा
त्रास तिने
प्रियकर उमेशच्या
कानावर घातला. आपल्याला
हनुमंतकडून वेळ
प्रसंगी मारहाण
देखील होत
असल्याची तक्रार
अनुराधाने उमेशला
सांगितली. अनुराधाला
पती हनुमंतकडून
जास्त त्रास
होवू लागल्याने
आता काय
करावे असा
प्रश्न उमेशला
पडला. अखेर
आपल्या वाटेतील
काटा काढण्याचा
विचार उमेशने
सुरु केला.  अखेर अनुराधा
उमेश
यांनी हनुमंत
यास संपवण्याचा
कट रचला.
उमेशचा एक
मित्र होता. त्याचे
नाव राजु
कावरे असे
होते. राजू कावरे
याच्या एका कार्यक्रमासाठी काही
वर्षापुर्वी उमेश
याने मंडप टाकून
दिला होता. त्या
कामाचे पैसे
उमेशने त्याला
मागितले नव्हते. आता
त्या बदल्यात
त्याच्याकडून हनुमंतचा
काटा काढण्याचे
उमेशने ठरवले. राजू
आणि उमेश
यांचे मैत्रीचे
संबंध होते. मंडप टाकल्याबाबत उमेशचे राजुकडे
जवळपास तिस
हजार रुपये
घेणे होते. ती
रक्कम उमेशने
आज पर्यंत
राजुला मागितली
नव्हती.  
दरम्यान उमेशने राजूची भेट घेऊन हनुमंतला संपवण्याबाबत चर्चा केली. यासाठी आधीची जुनी थकबाकी न घेता अजुन सत्तर हजार रुपये देवून हनुमंतला
या जगातून कायमचे संपवण्याचे नियोजन उमेशने राजुला सांगितले
. उमेशला मागील रक्कम न देता उलट त्याच्याकडून
अजुन सत्तर हजार रुपये मिळत असल्याचे ऐकून राजूने उमेशला त्याचे काम करण्यास होकार
दिला
.
राजुचा अजुन एक मित्र होता. त्याचे नाव आशिष असे होते. राजु व आशिष हे दोघे जिवलग मित्र होते. राजु म्हणेल  ते काम करण्यास आशिष करण्यास तयार रहात असे. हनुमंतला संपवण्याच्या कामात राजुने आशिष
यास हनुमंतला संपवण्याच्या कटात सहभागी करुन घेण्याचे ठरवले
. आशिषच्या घरी यंदा बहिणीचे लग्न करण्याचे नियोजन होते. त्या लग्नात मंडप व डेकोरेशन उमेशकडून
मोफत मिळवून देण्याचा प्लॅन राजूने आशिष यास सांगितला
.
ठरल्यानुसार 13 फेब्रुवारी रोजी उमेशने राजुला चाळीस हजार
रुपये दिले
. उर्वरीत रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे
ठरले
. दुस-याच दिवशी 14 फेब्रुवारी रोजी हनुमंत यास ठार करण्याचे
नियोजन करण्यात आले
.
१४ फेब्रुवारीला
गावातील शाळेत
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी
हनुमंत आणि
त्याचा ११
वर्षांचा मुलगा
हे दोघे
गेले. कार्यक्रम सुरू असतांनाच उमेशचा
हनुमंतला कॉल
आला. दुचाकी
बंद पडली असल्याचा बहाणा करत उमेशने फोन करुन
हनुमंत यास निंबोळी फाट्यावर बोलावुन घेतले
. फोन आल्यामुळे शाळेतील सांस्कृतीक कार्यक्रम
अर्धवट सोडून हनुमंतने निंबोळी फाट्यावर जाण्याचे ठरवले
. हनुमंतने
मुलाला बिस्कीट
घेऊन दिले
आणि उमेशकाकांना
घेण्यासाठी जात
असल्याचे सांगितले. त्यानंतर हनुमंत निंबोळी फाट्यावर जाण्यास निघाला. त्याठिकाणी ठरल्यानुसार अगोदरच राजु आणि
आशिष दबा धरुन बसले होते
. त्या ठिकाणी उमेश नव्हताच.
हनुमंत त्या ठिकाणी पोहोचताच राजू आशिषने अंधाराचा फायदा घेऊन हनुमंतला पकडले. दोघांनी मिळून हनुमंतचा गळा आवळला. गळा आवळला गेल्यामुळे काही क्षणातच हनुमंतने
आपला जिव सोडला
. हनुमंत मरण पावताच दोघांनी मिळून त्याचा
मृतदेह
ढेपेच्या रिकाम्या पोत्यात भरला. त्यानंतर हनुमंतच्याच दुचाकीवर त्याच्या मृतदेहाचे पोते घेऊन राजू आणि आशिष सुमारे २० किमी. अंतरावरील औरंगाबाद ते नागपूर महामार्गालगत वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पुलावर आले. मृतदेह भरलेले पोते नदीत टाकून दोघे गावात परत आले. खून झाल्यानंतर दुस-या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी उमेशने राजुला विस हजार
रुपये दिले
. दरम्यान त्यातील तिन हजार रुपये राजुने
आशिष यास दिले
. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी राजु गावातील काही लोकांना
सोबत घेवून पचमढीला निघून गेला
.
14 फेब्रुवारी रोजी मुलाला सोबत घेवून शाळेत
गेलेला हनुमंत घरी परत आलाच नाही
. घटना घडल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी विटाळा परिसरात वर्धा
नदीच्या पात्रात हनुमंतचा मृतदेह असल्याचे पोते वाहून आले
. ते पोते लोकांच्या नजरेस पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक
डॉ
. हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक
सोमनाथ तांबे
, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी कुमार चिंता, मंगरुळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक
दिपक वळवी
, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक
सुरज बोंडे
,.पो.नि. नरेंद्र
पेंदोर, पीएसआय
विश्वास वानखडे, एएसआय
संतोष मुंदाने, संदीप
लेकुरवाडे, चेतन
दुबे, युवराज
मानमोठे, श्याम
गावंडे, चंद्रशेखर
खंडारे, आश्विन
मानकर, दिनेश
कनोजिया, अमोल
केंद्रे, आशिष
भुंबर, मुकुंद
कडू, सईद
कदिर, योगेश
लाड यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळ व मृतदेहाची अधिकारी वर्गाने बारकाईने पाहणी केली. सर्व कायदेशीर सोपास्कर आटोपल्यानंतर मृतदेह
नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
. मयत हनुमंत याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर
त्याच्या खूनप्रकरणी मंगरुळ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
.
मयत हनुमंत याचा जवळचा मित्र म्हणून उमेश सावळकर सर्वांना परिचित होता. नेमका तो त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी
झाला नव्हता
. त्यामुळे परिसरातील लोकांमधे हा एक चर्चेचा
विषय झाला होता
. हि बाब पोलिसांना देखील समजली व खटकली. त्यामुळे त्याच्यावर लक्ष केंद्रीत करुन
पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली
. दरम्यान परिसरातील लोकांच्या चर्चेतून
मयत हनुमंत याची पत्नी अनुराधा व उमेश यांच्यातील प्रेमसंबधाची चर्चा पोलिसांपर्यंत
गेली
. तसेच शाळेच्या सांस्कृतीक कार्यक्रमात हनुमंत यास उमेशचा फोन आला होता. आपल्याला उमेशचा फोन आल्यामुळे आपण त्याच्याकडे
जात असल्याचे मुलाला सांगून तो शाळेतून बाहेर गेला होता
. त्यानंतर काही दिवसांनी हनुमंतचा मृतदेह
मिळून आला होता
. या सर्व बाबी पोलिसांना चौकशीसह चर्चेतून
मिळाल्या होत्या
. त्या दृष्टीने सर्वप्रथम उमेश सावळकर यास
ताब्यात घेण्याचे पोलिसांनी नियोजन केले
.
पोलिसांनी मयत हनुमंतची पत्नी अनुराधा व उमेश या दोघांना चौकशीकामी ताब्यात
घेतले. पोलिस 
अधिका-यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे
देण्यास सुरुवात केली
. मात्र पोलिसी खाक्या बघून शेवटी दोघांनी
आपला गुन्हा कबुल केला
.
उमेश व अनुराधा यांच्यातील संबंधाची
माहिती हनुमंतला
झाल्यानंतर तो अनुराधाला प्रचंड
त्रास द्यायचा. उमेशकडून
पैसे माग, असा
तगादा हनुमंत
लावत असल्याचे
उमेश आणि
अनुराधा पोलिसांना
सांगत होते. या प्रकरणात
दोघांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना
सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली
. पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा
कबुल करत त्यात अजुन नविन माहिती दिली
.
उमेशने दिलेल्या माहितीनुसार या खूनाच्या कटात राजू प्रल्हाद कावरे (२३) आणि आशिष अशोकराव ठाकरे (२१, दोघेही रा. हिंगणगाव, ता. धामणगाव रेल्वे) यांची नावे पुढे आली. त्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली
व सर्व घटनाक्रम उलगडला
. राजु कावरे यस बैतूल येथून तर आशिष ठाकरे
यास अमरावती बस स्थानकातून अटक करण्यात आली
.
14 फेब्रुवारीला रात्री उमेशने दुचाकी पंक्चर झाल्याचा बहाणा करून हनुमंतला निंबोळी फाट्यावर बोलावले होते. या वेळी उमेश त्या ठिकाणी नव्हता. हनुमंत त्या ठिकाणी पोहोचताच राजू आशिषने अंधाराचा फायदा घेऊन हनुमंतचा गळा आवळला आणि त्याचा मृतदेह ढेपेच्या रिकाम्या पोत्यात भरला. त्यानंतर हनुमंतच्याच दुचाकीवर पोते घेऊन राजू आणि आशिष सुमारे २० किमी. अंतरावरील औरंगाबाद ते नागपूर महामार्गालगत वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पुलावर पोहोचले. मृतदेह भरलेले पोते नदीत टाकून दोघे गावात परत आले होते. १३ फेब्रुवारीला यासाठी राजूला उमेशने ४० हजार, तर १५ फेब्रुवारीला खून झाल्यानंतर २० हजार रुपये दिले. दरम्यान यातीलच तीन हजार रुपये राजूने आशिषला दिले. १९ फेब्रुवारीला राजू गावातील काही व्यक्तींसोबत पचमढीला गेला होता. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी बैतूल गाठले आणि रविवारी पहाटे बैतूलवरून त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे राजूनेच फोन करून आशिषला अमरावती बसस्टँडवर बोलवले होते. त्यामुळे तो रात्री आठ वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत राजूची वाट पाहात होता. पोलिसांनी बस स्थानकावरून आशिषलाही अटक केली. ही कारवाई एलसीबीचे एपीआय सूरज बोंडे, एपीआय नरेंद्र पेंदोर त्यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here