जळगाव : वाळूच्या डंपरवर कायदेशीर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात दहा हजाराच्या लाचेची मागणी आणि स्विकार पोलिस उप निरीक्षकासह कर्मचा-याला भोवला आहे. वरणगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी व पोलिस कर्मचारी गणेश महादेव शेळके असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या दोघा जणांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या मालकीचे डंपर असून वरणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतून या डंपरने वाळूची वाहतुक केली जाते. या वाहनावर कायदेशीर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात पोलिस उप निरीक्षक यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. या मागणीनुसार लाचेची दहा हजार रुपयांची रक्कम कर्मचारी गणेश महादेव शेळके याने पोलिस स्टेशनमधे पंचासमक्ष स्विकारली.
लाचेची मागणी आणि स्विकार या दोन्ही बाबी एसीबीच्या नजरेत आल्यामुळे दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. जळगाव एसीबीचे डिवायएसपी सतिष भामरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच कारवाई ठरली आहे. या सापळ्यात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्दन चौधरी, पो. कॉ. प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पो. कॉ.ईश्वर धनगर, पो. कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.महेश सोमवंशी आदींनी सहभाग घेतला.