चाळीस लाखापर्यंतच्या सोने खरेदी विक्रीच्या व्यवहारास हॉल मार्कींगची सक्ती राहणार नसल्याचे पियुष गोयल यांनी जाहीर केले आहे. ज्या ठिकाणी हॉलमार्किंग सेंटर नाही त्या ठिकाणीदेखील हॉल
मार्किंग लागू होणार नाही. स्टॉक क्लिअरन्स साठी जुने दागिन्यांच्या विक्रीसाठी दोन महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सर्व लहान सुवर्ण व्यावसायिकांना यातून वगळण्यात आले आहे. शुद्धते बाबतची जबाबदारी हॉलमार्किंग सेंटरची असेल. शुद्धता तत्त्वतः मान्य करण्यात आली आहे.