राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात “एनआयए” ने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी येथील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी करण्यास सुरुवात केली होती. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणी प्रदीप शर्मा एनआयएच्या निशाण्यावर होते. लोणावळा येथील त्यांच्या रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.
सकाळी सहा वाजेपासूनच एनआयएचे पथक जेबीनगरमध्ये दाखल झाले होते. मोठ्या बंदोबस्तात प्रदिप शर्मा यांच्या भगवान नगर येथील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. अॅटेलिया स्फोटक याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे दोघे मित्र आहेत. या प्रकरणात नुकतीच संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक करण्यात आली होती. संतोष शेलार हा प्रदीप शर्मांच्या निकटचा व्यक्ती असल्याचे म्हटले जाते.