नवी दिल्ली : बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून भारताबाहेर पळालेल्या विजय माल्याचे 6200 कोटी रुपयांचे शेअर्स विकून त्याच्याकडील कर्जाची वसुली केली जाणार आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक समुह माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीस देण्यात आलेल्या 6200 कोटीच्या कर्जाची वसुली करणार आहे.
युनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील माल्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये 23 जून रोजी विक्री होणार आहेत. विजय माल्या यास भारताच्या ताब्यात दिले जावे अशी मागणी केली जात आहे. त्या मागणीच्या विरोधात विजय माल्या सध्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये खटला लढत आहे. माल्याच्या शेअर्सची विक्री झाल्यास मोठी वसुली होणार आहे.