पुणे : पुणे येथील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर आज ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. परकीय चलन नियमन कायदा (फेमा) 1999 नुसार आज ईडीने अविनाश भोसले यांची पुणे व नागपूर येथील तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले यांना फेब्रुवारीत पुणे येथून ईडीने ताब्यात घेत मुंबईल आणले होते. त्यांची देखील चौकशी सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे असलेले व्यावसायीक अविनाश भोसले व त्यांचा परिवार ‘ईडी’च्या रडारवर आहे. आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याकामी भोसले पिता पुत्रांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विदेशात मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्यासह त्यांची पत्नी गौरी भोसले यांची देखील कसून चौकशी झाली आहे. आजच्या ईडीच्या कारवाईने अविनाश भोसले यांना हा मोठा धक्का आहे.