अडीच हजाराच्या लाचेत गुरफटले!—— एसीबीच्या सापळ्यात दोघे अडकले!!

जळगाव : गुन्ह्यातील वारंटच्या कामी सकारात्मक मदत तसेच दारु विक्रीच्या व्यवसायात पुन्हा कारवाई करणार नाही या अटीवर लाचेची मागणी करणे पोलिस नाईक व होमगार्ड या दोघांना आज महागात पडले आहे. धरणगाव जिल्हा जळगाव अंतर्गत पाळधी दुरक्षेत्र येथे कार्यरत किरण चंद्रकांत सपकाळे व प्रशांत नवल सोनवणे अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
2 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे या पोलिस नाईकाने केली तर ती रक्कम होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे याने स्विकारली. पंचासमक्ष हा प्रकार उघड होताच दबा धरुन बसलेल्या जळगाव एसीबी पथकाने दोघांवर झडप घालत त्यांना ताब्यात घेतले.

तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करणेकामी व तक्रारदार यांच्या दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं.१ यांनी पंचासमक्ष 2,500/-₹ लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.१ यांचे सांगणेवरून आरोपी क्रं.२ यांनी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा.

पोलिस उप अधिक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.महेश सोमवंशी आदींनी या कारवाई पथकात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here