केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दौ-यात तुफान हाणामारी

On: June 23, 2021 8:14 PM

कुल्लू : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या हिमाचल प्रदेश दौ-यावर आहेत. आज दुपारच्या वेळी मंत्री नितीन गडकरी भुंतर विमानतळावर पोहोचले. यावेळी दोघा अधिका-यांमधे बेदम हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. मंत्री नितीन गडकरी भुंतर विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ताफा विमानतळाच्या बाहेर निघत होता. त्यावेळी दोघा अधिका-यांमधे जोरदार हाणामारी झाली.

कुल्लूच्या पोलीस अधीक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचे म्हटले जात आहे. सुरक्षा व्यवस्थेवरुन हा वाद वाढत गेल्यामुळे हा प्रकार झाला असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने देखील पोलीस अधीक्षकांना मारहाण केली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment