पतीच्या जाचाला त्रासलेल्या जळीत विवाहितेचा मृत्यू

जळगाव : काहीही कामधंदा  करत नसलेल्या व सासरहून सतत मदतीची अपेक्षा बाळगणा-या पतीच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणा-या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. संजय पाटील (मेहरुण – जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

सुप्रीम कंपनीजवळ कधीकाळी चहाची टपरी चालवणारा संजय पाटील सध्या बेरोजगार होता. तो कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याला दारु पिण्याचे व्यसन जडले होते. घरखर्च चालवण्यासाठी त्याची पत्नी रोजंदारीने कामाला जात होती. अशा परिस्थितीत तो पत्नीला माहेरुन नेहमी पाच हजार रुपये घेऊन येण्यास दबाव आणत होता. त्याच्याया त्रासाला त्याची पत्नी उज्वला पाटील वैतागली होती. पतीच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून तिने 24 जूनच्या रात्री आठ वाजता रंगात टाकण्याचे फिनर अंगावर ओतून स्वत:ला जाळून घेतले होते. तिच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय हॉस्पीटल व रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना 26 जून रोजी तिची मृत्यूशी झुंज संपली. त्यामुळे सामान्य रुग्णालयात तिची शव चिकीत्सा झाली. या प्रकरणी चेतन प्रकाश लाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. पोलिस उप निरीक्षक विजय गायकवाड करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here