दुचाकी चोरीचे गुन्हे एलसीबीने केले उघड

On: June 28, 2021 7:54 PM

जळगाव : एरंडोल व जामनेर येथे दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने उघडकीस आणले आहेत.

एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपी अजय संजय मोरे (सोनवद रोड पिंप्री खुर्द ता. धरणगाव) यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात कल्पेश उर्फ रघू मगन मालचे व नामदेव भिल (दोन्ही रा. भोद खुर्द ता. धरणगाव) यांची नावे उघड झाली. तिघांनी संगनमताने सुमारे दिड महिन्यापुर्वी पद्मालय गणपती मंदीर परिसरातून मोटारसायकलची चोरी केली होती. तिघांना चोरीच्या बजाज प्लॅटीना मोटारसायकलसह पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, प्रदिप पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींनी तपासात सहभाग घेतला.

जामनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील अतुल संजय इंगळे (गलवाडे ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद) यास ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार तो जळगाव जिल्ह्यात येऊन मोटार सायकलची चोरी करत होता. त्याने जामनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या दोन मोटारसायकली तपास पथकाच्या ताब्यात दिल्या. या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, विजय पाटील, पंकज शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपासकामी अटकेतील अतुल इंगळे यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment