मुंबई : सलग दोन वेळा लॉकडाऊन लागू झाल्यामुळे पैशांची चणचण निर्माण झाली. या आर्थिक चणचणीला वैतागून मॉडेलने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. प्रिया शर्मा उर्फ भावना असे आत्महत्या करणा-या मॉडेलचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळेनासे झाल्यामुळे प्रिया शर्मा मुंबई येथून तिच्या गावी उत्तर प्रदेशात गेली होती. पहिले लॉकडाऊन संपल्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली. मात्र तिला पुर्वीसारखे मॉडेलिंगचे काम मिळत नव्हते. त्यातच दुसरे लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे ती अजूनच निराशेच्या गर्तेत गेली होती. दरम्यान ती पुन्हा तिच्या मुळ गावी परतली. तिची बहिण रहात असलेल्या ग्रेटर नोएडा येथील पॅरामाऊट इमोशन्स या सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरील घराच्या बालकनीतून उडी घेत तिने आपली जिवनयात्रा संपवली.