पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

पुणे : पुणे शहर पोलिस दलात पोलिस उप निरीक्षक महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महिला पोलिस अधिका-याच्या मित्रानेच ही मारहाण केली असल्याचे उघड झाले आहे. माझ्यासोबत लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या पोलिस अधिका-यास कथित मित्राने केली आहे.

सिद्धांत भगवानराव जावळे (30) असे मारहाण करणा-या तरुणाचे नाव आहे. सिद्धांत हा मुळ बिड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी आहे. महिला पोलिस उप निरीक्षक व सिद्धांत हे दोघे मित्र होते. हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर सहवासात व नंतर प्रेमात होण्यास वेळ लागला नाही. मात्र नंतर संशयाचे भुत त्याच्या मानगुटीवर बसले. तो महिला अधिका-यास शिवीगाळ व मारहाण देखील करु लागला. सुरुवातीला लग्नास होकार देणा-या महिला अधिका-याने त्याला नंतर नकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघे सोबत असलेला व्हिडीओ प्रसारीत करण्याची त्याने महिलेस धमकी देण्यास सुरुवात केली. महिला पोलिस अधिका-याचा नकार मिळताच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासह सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्याची तो धमकी देऊ लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here