खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली – चौकशी सुरुच

मुंबई : माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडीच्या कोठडीत नव्याने वाढ झाली आहे. ईडीच्या कस्टडीत असलेले गिरीष चौधरी यांची कोठडी आता 15 जुलै पर्यंत झाली आहे. ईडीने चौकशीकामी एकनाथराव खडसे यांना देखील बोलावले होते.

याप्रकरणी संबंधितांचे जाबजवाब घेण्याचे कामकाज सध्या प्रगतीपथावर आहे. अटकेतील खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांची चौकशी बाकी असल्याचे ईडीने न्यायालयास सांगितल्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.

ईडीने केलेल्या आरोपानुसार सन2016 मधे एकनाथराव खडसे महसुलमंत्री असतांना पुणे – भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीची जमीन गिरीष चौधरी यांनी खरेदी केली होती. पुणे येथील एका उद्योजकाने या व्यवहार प्रकरणी बंड गार्डन पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. एसीबीने या तक्रारीचा आधार घेत चौकशी व तपासाअंती एकनाथराव खडसे व त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीष चौधरी यांच्यासह जागेचे मुळ मालक अब्बास उकानी अशा सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here