जनरेटरच्या धुरामुळे सहा जण मृत्युमुखी

चंद्रपूर : वीज गेल्यानंतर जनरेटरचा वापर नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. चंद्रपुर येथील दुर्गापूर परिसरात जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन सहा जण मृत्युमुखी पडले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्गापूर परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने खळबळ माजली आहे. रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुरामुळे गुदमरुन एकाच कुटूंबातील सात पैकी सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. दुर्गापूर भागातील वॉर्ड क्र. 3 मधे घडलेल्या या घटनेतील मृत्युमुखी पडलेले सदस्य मजुर वर्गातील आहेत.

रात्री अचानक वीज गेल्यानंतर या परिवाराने डीझेलवर चालणारा जनरेटर संच लावल्यामुळे सदस्यांचे श्वास गुदमरले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. सकाळच्या वेळी परिसरातील लोकांना सहा मृतदेह आढळून आले. या कुटूंबाने डिझेलवर चालणारा जनरेटर संच लावला होता. या धुरामुळे श्वास गुदमरुन सहा जण मृत्युमुखी पडले मात्र एक जण बचावला. सकाळी परिसरातील लोकांच्या लक्षात हा प्रकार आला.

रमेश लष्करे ( 44), अजय लष्करे (20), लखन लष्करे (9), कृष्णा लष्करे (8), माधुरी लष्करे (18), पूजा लष्करे (14) अशी मृत झालेल्या सदस्यांची नावे आहेत. दासू लष्करे (40) हा सुदैवाने बचावला आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here