मेफेड्रॉनचा सव्वा तीन लाखांचा माल जप्त महिलेसह दोघांना अटक

काल्पनिक छायाचित्र

पुणे : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केला आहे. विवेक तुळशीराम लुल्ला (४३) व हेमा किसनलाल सिंग (३०) दोघेही रा. नवी मुंबई अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांची आपल्या सहकार्‍यांसोबत गस्त सुरु होती. त्यावेळी त्यांना बाणेर येथे दोन जण अंमली पदार्थ घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी बाणेर येथील नॅशनल इन्श्युरन्स अ‍ॅकॅडेमी परिसरात सापळा लावला. 

या ठिकाणी आलेल्या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. झडती दरम्यान त्यांच्याकडे ३ लाख २७ हजार २५० रुपयांचा ६५ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला.

दोन मोबाईल, १ हजार रुपये रोख असा ३ लाख ३१ हजार ३१ हजार ७५० रुपयांचा माल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनला एनडीपीएस कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली आहे.

‘क्राइम दुनिया ‘ला फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (https://www.facebook.com/crimeduniyanews/) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

व्हाट्स अप्प ( https://chat.whatsapp.com/KbXSwZVvwhSGnc0IqyCEfI )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here