मुंबई : ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीकडून चौकशीकामी समन्स बजावले आहेत. त्यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक अटकेत आहेत. अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि मुलाला देखील ईडीने अशाच स्वरुपाचे चौकशीकामी समन्स बजावले आहेत.