जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणी डॉ.भुषण मगर संचलीत “विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल”मधे सर्व धर्मियांच्या भावनेचा अवमान होत असल्याचे वृत्त क्राईम दुनियाच्या माध्यमातून काही दिवसांपुर्वी प्रसारीत झाले होते. या वृत्ताने जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. या वृत्ताची दखल घेत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल प्रशासन खळबळून जागे झाले.
क्राइम दुनियाच्या वेबसाईटवर वृत्त प्रसारीत झाल्यानंतर दुस-याच दिवशी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भुषण मगर यांनी सर्व धर्मियांच्या भावनेचा अनादर होणा-या त्या सर्व वादग्रस्त टाईल्स काढण्याच्या हालचाली वेगाने सुरु केल्या. क्राईम दुनियाच्या बातमीचा हा थेट परिणाम असल्याचे पाचोरा शहर, तालुका व जळगाव जिल्ह्यातील जनतेला दिसून आले आहे. या प्रकरणी अनेकांनी “क्राईम दुनिया”चे आभार मानले आहे. क्राईम दुनियाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता पाय-यांवरील बुट चपला काढण्याच्या जागी असलेले घाणीचे साम्राज्य अदृश्य झाल्याचे आढळून आले.
सर्व धर्मीयांचे प्रतिक चिन्ह दर्शवणा-या टाईल्स रुग्णालयाच्या पाय-यांवर बुट चपला काढण्याच्या जागी तळाशी लावल्यामुळे जनतेच्या मनात रोष निर्माण झाला होता. या बातमीचा भविष्यातील परिणाम लक्षात घेत त्या सर्व टाईल्स तातडीने काढून टाकण्यात आल्या आहेत. सर्व धर्मीयांच्या भावनेचा अनादर यामुळे थांबला आहे. भविष्यात निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती देखील यामुळे टळली आहे. विघ्नहर्ता गणरायाने दिलेल्या सद्बुद्धीमुळेच हे विघ्न दुर झाल्याचे देखील या निमीत्ताने म्हटले जात आहे. समाजातील गुन्हेगारी व अपप्रवृत्तीचा वेध घेऊन तो जनतेसमोर आणण्याचे काम क्राईम दुनियाच्या माध्यमातून नेहमीच होत असते. समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे क्राईम दुनियाकडून नेहमीच स्वागत केले जाते.