अश्लिल फिल्म व्यवसायात कुंद्रा होता माहीर ! — पोलिस तपासात त्याचे कारनामे झाले जाहीर !!

On: July 20, 2021 7:53 PM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी 23 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत राहणार आहे. राज कुंद्रा याच्यावर भा.द.वि. 420 आणि 67 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधे जामीनाची तरतूद नाही.

राज कुंद्रा व त्याचा साथीदार प्रकाश बक्षी यांच्यात झालेली व्हाटस अ‍ॅप चॅटींग पोलिस तपासात पुढे आली आहे. या चॅटींग नुसार राज कुंद्रा याचे अश्लील चित्रपट निर्मिती ते वितरण या सर्व घटकांवर बारकाईने लक्ष असल्याचे दिसून येते. अश्लिल चित्रपट दर आठवड्याला प्रसारीत करण्याबद्दल राज कुंद्रा हा प्रकाश बक्षी यास सांगत असल्याचे चॅटवरुन दिसून आले आहे. प्रकाश बक्षी हा राज कुंद्रा याची लंडन मधील कंपनी चालवत होता. लंडन मधून विविध अ‍ॅप्सवर अश्लिल चित्रपट अपलोड केले जात होते. कोणत्या नायिकेला कधी बोलवायचे, तिच्याशी कसे बोलायचे, कसा व्यवहार करायचा, तिला केव्हा कॉल करायचा या सर्व बाबींंचा तपशील पोलिस तपासात दिसून आला आहे.

वेब सीरीज तयार करण्याच्या बहाण्याने अश्लील चित्रपटांची शूटिंग करणारे रॅकेट मुंबई गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आणले होते. त्यावेळी पाच जणांना अटक झाली होती. त्याचवेळी हे चॅट समोर आले होते. यु.के. स्थित प्रकाश बक्षी यांची केनरिन प्रॉडक्शन हाऊस ही कंपनी देखील असून या कुंद्राची भागीदारी आहे. अप्रत्यक्षपणे राज कुंद्रा या कंपनीचा मालक आहे. राज कुंद्रा याच्याकडे पुर्वी खासगी सहायकाचे काम करणारा उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचे भारतातील कामकाज बघत होता. हि कंपनी विविध एजंटांना अश्लिल चित्रफिती पुरवण्यासह अर्थसहाय्य करत असल्याचा आरोप केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment