रंग बदलून वापरात असलेली ट्रॉली चोरट्यांसह हस्तगत

जळगाव : चोरी केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा रंग बदलून, चेसीस क्रमांक तोडून वापरात असलेली ट्रॉली दोघा चोरट्यांसह जळगाव एलासीबी पथकाने ताब्यात घेतली आहे. सागर उर्फ गोल्या रमेश मोरे व आकाश ज्ञानेश्वर शिंदे (दोघे रा. आव्हाणे – जळागाव) अशी ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनाआव्हाणे बस स्थानकानजीक असलेल्या मंदीर परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.शिरसोली येथील रहिवासी असलेले शेतकरी निजामोद्दीन पिंजारी यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली गेल्या सहा महिन्यापुर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला ट्रॉली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी या चोरीचा तपास करत होते.

सहा महिन्यापुर्वी शिरसोली गावातुन जळके गावाच्या दिशेने जाणा-या रस्त्यालगत निजामोद्दीन पिंजारी यांच्या मालकीची ट्रॉली उभी होती. इरफान उर्फ इमरान उर्फ फुत्रा खानसाहब शेख याच्या मदतीने या दोघा आरोपींनी ती ट्रॉली चोरुन आणली होती. तिघांनी मिळून चोरी केलेल्या त्या ट्रॉलीचा निळा रंग बदलून भगवा (नारंगी) करुन टाकला.

रंग बदलल्याने ट्रॉली चोरीची असल्याचा कुणाला संशय येणार नाही असे तिघांना वाटत होते. तसेच या ट्रॉलीचा चेसीस क्रमांक देखील तिघा आरोपींनी तोडून टाकला होता. हा प्रकार झाल्यानंतर इरफान याने एका ओळखीच्या इसमाला ती ट्रॉली पैशांची गरज असल्याचे खोटे सांगून विक्री केली होती. या ट्रॉलीचे कागदपत्र नंतर आणून देतो असे सांगत इरफान याने ती ट्रॉली विकून टाकली होती.

या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ. सुधाकर रामदास अंभोरे, हे.कॉ. जितेंद्र राजाराम पाटील, पोना. नितीन प्रकाश बाविस्कर, पोना. प्रीतम पिंताबर पाटील , पोना. राहुल जितेंद्रसिंग पाटील आदींनी तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here