औरंगाबाद : हातात लाठ्या – काठ्या अशी घातक शस्त्रे हाती घेत रात्री बेरात्री फिरणा-या टोळ्यांचा वावर वाढला आहे. या टोळ्यांमुळे औरंगाबाद शहर व परिसरात रहिवाशांमधे दहशत पसरली आहे. काही दिवसांपुर्वी पडेगाव शिवारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधे या टोळ्या कैद झाल्या होत्या. या सर्व घडामोडी लक्षात घेत पोलिसांनी आपली शोध मोहीम तिव्र केली आहे. हि टोळी परगावची असल्याचे म्हटले जात आहे. दाट वस्ती नसलेल्या वसाहतींना या टोळ्या आपले लक्ष करत असल्याचे देखील या निमीत्ताने म्हटले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपुर्वी पडेगाव परिसरातील रामगोपालनगर, तारांगण कासलीवाल अशा विविध वसाहतीच्या भागात या शस्त्रधारी टोळ्या सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. छावणी पोलिसांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेदेखील या परिसरात पाहणी केली असून तपासाची दिशा ठरवली आहे.