औरंगाबाद (फर्दापूर) : बोलेरो पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत एक जण ठार व एक गंभीर जखमी झालाआहे. फर्दापूर – सोयगाव रस्त्यावरील पुलाजवळ रात्री आठ वाजता ही अपघाताची घटना घडली आहे. वैद्यकीय उपचार होण्याकामी जखमी तरुणाला सोयगाव व नंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.
फर्दापूरहून सोयगावच्या दिशेने मिरची घेऊन जाणारे बोलेरो पिकअप (एमएच 04 ईवाय 4526) व निंबायती येथून येणारी दुचाकी (एमएच 21 बीएन 6959) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत बिलाल नजीर तडवी (32) हा तरुण जागेवरच गत:प्राण झाला. निखिल जालेखा तडवी (दोघे रा. शेलूद, ता. भोकरदन) याला मोठ्या प्रमाणात मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे वृत्त समजताच फर्दापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उप – निरीक्षक सुधाकर दौड, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर सरताळे यांनी घटनास्थळ धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.