जालना (परतूर) : परतूर शहराच्या आंबेडकर नगर भागातील महिला आपल्या तिघा मुलींसह गेल्या 1 जून पासून बेपत्ता झालेली होती. विविध ठिकाणी शोध घेऊन देखील तिचा तपास लागत नव्हता. अखेर तिच्या पतीने 20 जुलै रोजी परतूर पोलिस स्टेशनला तिच्या बेपत्ता होण्याबाबतची तक्रार दाखल केली होती. परतूर पोलिसांनी तिचा शोध घेत तिला तिच्या 13, 14 व 7 वर्षाच्या तिघा मुलींसह औरंगाबाद शहराच्या मुकुंदवाडी परिसरातून ताब्यात घेतले. या घरातून 80 हजार रुपये घेत सदर महिला बेपत्ता झाली होती.
पो.नि. श्यामसुंदर कौठाळे यांच्या पथकातील पोलिस नाईक रवींद्र गायकवाड व पो.कॉ. सतीश जाधव यांनी महिलेच्या पतीला सोबत घेत मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मुकुंदवाडी परिसरातून एका नातेवाइकाच्या घरातून ताब्यात घेतले. कौटुंबिक कलहातून आपण घर सोडून गेल्याचे तिने आपल्या जबाबात नमुद केले आहे.