औरंगाबाद : सुमारे 292 वर्षांपूर्वी निझामाने बांधलेल्या किल्ल्यावरील मिनार दगडाची सराय येथे बुधवारी दुपारच्या सुमारास एका घरावर पडला. या वेळी घरावरील पत्र्यांसह भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी घरात कुणी नसल्यामुळे प्राणहाणी टळली. पहिला निझाम आसिफ-जहाँ-अव्वल यांच्या कालावधीत सन 1729 -30 दरम्यान जुन्या किल्ल्यांची निर्मीती करण्यात आली आहे. सराय येथे अशाच स्वरुपाचा एक किल्ला गोलाकार वेढलेला आहे. पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हा किल्ला भग्न झाला असून केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.