जळगाव : भुसावळ येथून जळगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज महामार्गावरील दुरदर्शन टॉवरनजीक घडली. सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दुचाकीने जळगावच्या दिशेने प्रवास करणा-यापैकी एक ठार व एक गंभीर जखमी आहे. प्रकाश जोशी असे मृत्यूमुखी पडलेले व आदिती जोशी असे गंभीर जखमीचे नाव आहे. दोघे बाप लेक जळगावच्या दिशेने दुचाकीने येत होते.

जखमी आदिती जोशी हिस सुरुवातीला सामान्य रुग्णालयात व नंतर सहयोग क्रिटीकल येथे उपचारार्थ नेण्यात आले आहे. प्रकाश जोशी यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही जळगाव जनता बॅकेत येण्यासाठी भुसावळ येथून निघाले होते. मात्र काळाने रस्त्यातच त्याच्यावर अप्घात रुपाने हल्ला केला. अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रकाश जोशी हे जळगाव येथील सीए अतुल श्रीकांत पाठक यांचे मामा होते. जखमी आदिती ही त्यांची मामे बहीण आहे. अतुल पाठक यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चालकाविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
