जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेतील संशयीतांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढली आहे. वेगवेगळ्या पैलूंनी या प्रकरणी जोमाने तपास सुरु आहे. पो.नि. अनिल बडगुजर यांच्या निर्देशाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
या गोळीबार प्रकरणी इतर फरार आरोपींचा कसुन शोध सुरु असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. फरार संशयीत आरोपी लवकरच जेरबंद केले जाणार असल्याचे तपास अधिकारी तथा स.पो.नि. संदीप परदेशी यांनी “क्राईम दुनिया” सोबत बोलतांना म्हटले आहे. अटकेतील संशयीतांनी फायर केल्याची कबुली दिली असून या प्रकरणी अजून काय माहिती पुढे येते याकडे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागून आहे.