तरुणाचा तुळजापुरात भरदिवसा खून

सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील युवकाचा तुळजापूर शहरात भरदिवसा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. गुरुवाच्या सायंकाळी शहरातील लातूर रस्ता चौकात असलेल्या शासकीय गोदामात हा खूनाचा प्रकार घडला. हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा होती.

शंकर दाजी गायकवाड असे काक्रंबा येथे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शंकर हा तरुण तुळजापूर शहराच्या लातूर रस्ता चौकातील शासकीय धान्य गोडाऊनमधे असतांना अनोळखी व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटावर व छातीवर सपासप वार केले. शंकरने जीव वाचवण्यासाठी गोदामाच्या बाहेर येत आक्रोश केला. पोलिस कर्मचा-यांसह काही तरुणांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शंकरचा मूत्यू झाला. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची यावेळी परिसरात चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here