बाळ बोठेच्या जामीन अर्जावर 4 ऑगस्टला होणार सुनावणी

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर येत्या 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाने आपले म्हणणे मांडण्याकामी मुदत मागितली असता न्यायालयाने 4 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्याच्या जातेगाव येथील घाटात गळा चिरुन खून करण्यात आला होता. हत्येनंतर पाच जणांना अटक करण्यात आली होती. या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे असल्याची कबुली अटकेतील संशयीतांनी दिली होती. तिन महिन्यांनी हैद्राबाद येथील बिलालनगर भागातून बाळ बोठे यास अटक करण्यात आली होती. बाळ बोठे सध्या पारनेर येथील न्यायालयीन कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here