गोळीबाराच्या घटनेत आरोपींनी बाळगले होते पेट्रोल?

जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपींच्या विरुद्ध 120 ब हे कलम वाढवण्यात आले आहे. संशयीत आरोपींनी केलेला गुन्हा हा पुर्वनियोजीत कट असल्याचे म्हटले जात आहे. पुर्व नियोजीत कटानुसार आरोपींनी त्यांच्याजवळ पेट्रोलने भरलेल्या काही बाटल्या देखील बाळगल्या होत्या असे म्हटले जात आहे.

अटकेतील संशयीत आरोपी रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. गोळीबार प्रकरणी संशयीत आरोपींविरुद्ध “120 ब” हे कलम वाढवण्यात आलेआहे. संशयित आरोपींनी केलेला गुन्हा पुर्वनियोजीत असल्याचे म्हटले जात आहे. हा सर्व कट पुर्वनियोजीत होता असे माहितगार सुत्रांकडून सांगितले जात आहे. तसेच या गुन्ह्यात संशयीत आरोपींनी त्यांच्याजवळ पेट्रोल देखील बाळगले असल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्यात वेळ प्रसंगी पेट्रोलचा देखील वापर केला जाणार र्होता. पेट्रोलचा वापर झाला असता तर अजुन मोठा अनर्थ झाला असता. मात्र तशी वेळ आली नाही व उप महापौर गोळीबाराच्या घटनेतून देखील बालंबाल बचावले आहेत.

तसेच इतर फरार आरोपींच्या मागावर पोलिस पथक असून लवकरच त्यांना देखील लवकरच अटक केली जाणार असल्याचे समजते. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here