लाचखोर महिला उप – जिल्हाधिकारी मनीषा राशीनकरांना न्यायालयीन कोठडी

उस्मानाबाद : भूम येथील उप जिल्हा अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्याप्रकरणी भूम न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांची उस्मानाबाद जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वाळूमाफियाकडून लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या तपासात विविध पैलू उघड झाले असल्याचे म्हटले जात आहे.

या लाचखोरी प्रकरणी महसुल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या रडारवर आले आहेत. उपविभागीय दर्जाचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडल्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. महिला उप जिल्हाधिकारी मनिषा राशीनकर यापूर्वी काही वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. पंचासमक्ष त्यांनी लाचेची मागणी करत स्विकारली असल्याचे उघड झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याकडे असलेल्या बेहिशेबी अपसंपदेची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here