कमरेला दगड बांधून चोऱ्या करणा-या टोळीचा पर्दाफाश

अमरावती : गावोगावी हिंडून दिवसभर झाडूची विक्रीच्या बहाण्याने रेकी व रात्री चो-या करणा-या टोळीचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. कमरेला दगडगोटे बांधून त्या दगडगोट्यांचा शस्त्र म्हणूण वापर करण्याची या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत आहे. या टोळीने गेल्या पाच महिण्यात अमरावतीसह इतर जिल्ह्यात अशाच पद्धतीने गुन्हे करुन 23 घरफोड्या केल्याचे या उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीअंती अटकेतील चौघा जणांकडून चाळीसपेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल देखील झाल्याचे तपासात समोर आले आहे.

विनोद तुकाराम चव्हाण (26), दिनेश तुकाराम चव्हाण 23), दोघे रा. डेबुजीनगर, रहाटगाव, अमरावती, इग्नेश मलप्पा चव्हाण (25) आणि विकास ऊर्फ रंग्या मलप्पा चव्हाण (40), दोघेही रा. वाघोली या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. तपन कोल्हे व त्यांच्या सहका-यांनी अटक केली आहे. विनोद चव्हाण हा या टोळीचा म्होरक्या असून तो त्याच्या साथीदाराच्या मदतीने गेल्या मार्च 2021 पासून अमरावती जिल्ह्यात चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीची गुन्हे करण्याची अजून एक पद्धत अशी की हे चोरटे मुख्य गावात चो-या करत नाही. मुख्य रस्त्यापासून साधारण पाच ते सहा किलोमिटर अंतरावर आत असलेले गाव या टोळ्यांचे लक्ष असते. कुणी पाठलाग केला म्हणजे ही टोळी जवळ असलेल्या दगडांचा मारा जमावावर करते.

पोलिसांनी टोळीतील चौघांकडून 5 लाख 80 हजारांच्या सोन्यासह 6 लाख 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ज्या गावात दुपारच्या वेळी झाडू विकून झाले त्याच गावात रेकी करुन रात्रीच्या वेळी चो-या करणे हा या टोळीचा उद्योग आहे. पुढील तपासकामी या टोळीला लोणी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here