जळगाव : भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी भागातून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास याच्या ताब्यातून तलवार, चाकू व बंदूक असा घातक शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या या तपासकामी दोन पथकांची नेमणूक करण्यात आली होती. या पथकात डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि. दिलीप भागवत यांच्या निर्देशाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पो.हे.कॉ. जयराम खोडपे, पो. हे.कॉ. नेव्हील बाटले, पो.हे. कॉ.रविंद्र बि-हाडे, पो.ना.कृष्णा देशमुख, पो.ना.समाधान पाटील, पो.कॉ.प्रशांत सोनार, म.पो.कॉ. मिना कोळी आदींनी यात सहभाग घेतला होता. काल दुपारी झालेल्या या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे. या तपासकामी सुमारे 58 संशयीत आरोपींची घरझडती करण्यात आली होती