जळगाव : जळगाव शहरातील अल्पवयीन मुलीस फुस लावत पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दहेकर या संशयीत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा व अल्पवयीन मुलीचा शोध घेतला जात आहे.
मजुरी करणा-या कुटूंबातील अल्पवयीन मुलीची आई कामावरुन परत आल्यावर तिला आपली मुलगी घरात आढळली नाही. मुलीचा शोध घेत असतांना सुप्रिम कॉलनी भागातील रहिवासी सागर दहेकर याच्यासोबत अल्पवयीन मुलगी गेली असल्याचे तिच्या आई व नातेवाईकांना समजले. त्याचा शोध घेतला असता तो देखील गायब झालेल होता. सागर यानेच अल्पवयीन मुलीला फुस लावत पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.