पीएसआयच्या बेपत्ता पत्नीच्या मृत्युप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद

धुळे : कल्याण येथे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक बळवंत सुखदेव पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील या गेल्या 27 जुलै पासून बेपत्ता होत्या. रुपाली पाटील यांचा मृतदेह काल दुपारी धुळे शहरातील नकाणे तलावानजीक आढळून आल्याने खळबळ माजली होती.

रुपाली पाटील हरवल्याप्रकरणी कल्याण येथील खडकपाडा पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली होती. कल्याण परिसरातील गांधीरोड येथून बेपत्ता झाल्या होत्या. धुळे येथे काल त्यांचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी विषप्राशन केल्याचे देखील उघड झाले आहे. त्यांचे पती बळवंत सुखदेव पाटील हे कल्याण स्थानिक गुन्हे शाखेत पोलिस उप निरीक्षक आहेत.

रुपाली पाटील यांचे माहेर धुळे येथील असून सासर जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील तळई येथील आहे. रुपाली पाटील यांच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या विषारी औषधाच्या बाटलीजवळ असलेल्या कागदावर त्या औषधाचे नाव नमुद करण्यात आले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पो.नि.हेमंत पाटील पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here