पुणे : पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्तपदी असलेल्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या आवाजातील एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. आपल्या हद्दीत असलेल्या हॉटेलमधून मोफत बिर्याणीची ऑर्डर देण्यासंदर्भातील ती ऑडीओ क्लिप आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या ऑडीओ क्लिपची दखल घेतल्यानंतर एका वृत्त वाहिनीसोबत बोलतांना प्रियंका नारनवरे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ती ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे नारनवरे यांनी म्हटले आहे. ज्या झोनमधे आपण उपायुक्त आहे त्याठिकाणी असलेले वसुलीचे रॅकेट उध्वस्त केल्याचा संबंधितांना राग आल्यामुळे या बनावट क्लिपचा आधार घेत कट रचण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान या ऑडीओ क्लिपमुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली होती. पोलीस उपायुक्तपदी असलेल्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांना 88 हजार रुपये एवढा दरमहा पगार आहे. हे षड्यंत्र पुणे पोलीस दलातील डीसीपी दर्जाच्या अधिका-यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून केला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.