राज्याची पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल “टू बी ऑर नॉट टू बी” अशी सरकारची अवस्था

वारंवार वाढत असलेले लॉकडाऊन आणी वाढत असलेल्या अटीशर्थी व निर्बंध नागरीकांसाठी एक डोकेदुखी होत आहे. गेल्या 22 मार्च पासून सुरु झालेले लॉक डाऊन अजूनही वेगवेगळ्या स्वरुपात आणि अटीशर्थीसह सुरुच आहे. लॉक डाऊनचा सामना करत असतांना व्यापारी वर्ग आता मेताकुटीला आला आहे. या व्यापारी वर्गावर आधारीत असलेला कर्मचारी वर्ग देखील आता वैतागला आहे.

वारंवार सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे आर्थिक चक्र पुर्णपणे थंडावले आहे. पैशांची उत्पत्ती होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या सततच्या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य जनतेची आर्थिक, मानसीक व सामाजिक पातळी ढळत आहे. लॉकडाऊन सुरु असले तरी कोरोनाची साखळी तुटण्याची चिन्हे दिसत नाही. कडक लॉकडाऊन सुरु असले तरी देखील कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

चीनच्या बुहान शहरातून आलेल्या कोरोना विषाणूने गेल्या जवळपास पाच महिन्यांचा कालावधीत सर्व जगाला आवळले आहे. यातून आपला भारत देश देखील सुटला नाही. कोरोना रुग्णसंख्येत भारताच तिसरा क्रमांक लागतो. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची वाढत जाणारी संख्या बघता वारंवार लॉकडाऊन वाढवले जात आहे.  

अनलॉक करता करता राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात मंत्री, आमदार-खासदार, नगरसेवक, सरपंच आदी मंडळीनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरीओम चा नारा देत लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्याचे चित्र बघता राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. टू बी ऑर नॉट टू बी अशी सरकारची अवस्था झाल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here